पॅरिस :
फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सार्कोजी यांच्याकडून देशाचा सर्वोच्च पुरस्कार लीजन ऑफ ऑनर काढून घेण्यात आला आहे. भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरल्यावर निकोलस सार्कोजी यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान गमवावा लागला आहे. 2021 मध्ये अध्यक्षपद सोडल्यापासून सार्कोजी हे कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जात आहेत. सार्कोजी हे स्वत:च्या कार्यकाळादरम्यान देखील वादग्रस्त ठरले होते. सार्कोजी यांना फ्रान्सच्या सर्वोच्च न्यायालयाने भ्रष्टाचार प्रकरणी ठोठावण्यात आलेली शिक्षा कायम ठेवली होती.









