दोडामार्ग / वार्ताहर-
भाजपचे डोंबिवली – मुंबई येथील आमदार तथा सिंधुदुर्गचे सुपूत्र रवींद्र चव्हाण यांची आज मंत्रीपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधदुर्ग जि. प. चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी श्री. चव्हाण यांची खास भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. शिंदे सरकारमधील काही मंत्र्यांचा आज शपथविधी होता. त्यात श्री. चव्हाण यांनी मंत्रिपदाची शपथ आज घेतली. मुंबई येथे तातडीने प्रयाण करत श्री. म्हापसेकर यांनी चव्हाण यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.









