ओटवणे प्रतिनिधी
चराठा माजी उपसरपंच सौ माधुरी महादेव कोठावळे (५७) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होत्या. गुरूवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, दिर, जाऊ, नातवंडे, जावई असा परिवार आहे. येथील महादेव कोठावळे यांच्या त्या पत्नी तर मनोज उर्फ बंटी कोठावळे यांच्या त्या मातोश्री होत.









