भाजपचे विधानपरिषदेचे सदस्य व माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने त्यांनी भाजपला आपला राजीनामा दिला आहे.
आज बोलवविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भाजपमध्ये पूर्वीसारखे वातावरण नाही. पार्टीचे वरिष्ठ नेते आपल्याला तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते परंतु आपल्याला उमेदवारी दिली गेली नाही. उद्या गुरुवारी मतदार संघातील जनतेचे मत जाणून घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल. पार्टीला मातेसामान मानलो होतो. आई कधी मुलांना विषप्राशन करत नाही पण आता काळ बदलेला आहे अशी भावना उमटू लागली आहे. आपण या मुळे असमाधान असल्याचे सांगून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. .









