Former Deputy Chairman of Panchayat Samiti Gurunath Naik passed away due to heart attack
उगाडे येथील रहिवासी तथा सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती गुरुनाथ अंकुश नाईक यांचे आज शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. दोडामार्ग पंचायत समिती अस्तित्वात येण्यापूर्वी दोडामार्ग मधील कारभार हा सावंतवाडी पंचायत समितीमधून पहिला जात होता त्यावेळी ते सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.
दोडामार्ग – वार्ताहर









