वृत्तसंस्था / कराची
पाकचे माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट पंच मोहम्मद नझीर ज्युनिअर यांचे लाहोरमध्ये गुरुवारी वयाच्या 78 व्या वर्षी दीर्घकालीन आजाराने निधन झाले.
गेल्या काही महिन्यांपासून मोहम्मद नझीर यांच्यावर निवासस्थानी वैद्यकीय इलाज सुरु होता. पाच वर्षांपूर्वी झालेल्या वाहन दुर्घटनेमध्ये त्यांनागंभीर दुखापत झाली होती. पाक संघातील मोहम्मद नझीर ज्युनिअर हे हुकमी फिरकी गोलंदाज म्हणून ओळखले गेले. 1979-80 साली पाकमध्ये झालेल्या इम्रान खानच्या नेतृत्वाखालील विंडीज विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद नझीर यांचा पाक संघात समावेश होता. मोहम्मद नझीर यांनी क्रिकेट कारकिर्दीत 14 कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 800 बळी मिळविले. त्यांनी 15 वनडे आणि 5 कसोटीत पंचगिरी केली आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यांचा पाक संघात समावेश होता.









