वृत्तसंस्था/ मुंबई
भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच पिलू रिपोर्टर यांचे रविवारी ठाणे येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे.
पिलू रिपोर्टर हे आंतराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील दर्जेदार क्रिकेट पंच म्हणून ओळखले जात. आपल्या 28 वर्षांच्या क्रिकेट पंच कारकीर्दीमध्ये त्यांनी 14 कसोटी आणि 22 वनडे सामन्यात पंचगिरी केली आहे. 1986 साली पाक आणि विंडीज यांच्यात झालेल्या क्रिकेट मालिकेसाठी पाकचे तत्कालिन कर्णधार इम्रान खान यांनी पिलू रिपोर्टर आणि व्ही. के. रामस्वामी या दोन भारतीय क्रिकेट पंचांना खास निमंत्रण दिले होते. पिलू हे महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये कार्यरत होते.









