माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी वेधले लक्ष
सावंतवाडी । प्रतिनिधी
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेऊन भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गेले २० दिवस रखडलेले गटार बांधकामाचे काम माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी नगरपालिका अधिकारी , बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार सरडे ,मनोज राऊळ, प्रदीप कशाळीकर , यांचे लक्ष वेधत ठेकेदाराला रखडलेले काम त्वरित सुरू करण्यास सांगितले .पंधरा ते वीस दिवसांपूर्वी गटार बांधकामाची खोदाई सुरु करण्यात आली होती . त्यानंतर हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन ठेकेदार नाईक यांच्याकडून देण्यात आले . परंतु पंधरा दिवस उलटून गेले तरी गटार बांधकामाचे काम हाती घेण्यात आले नाही . त्यामुळे नागरिकांनी तक्रारीचा सूर लावला होता . याची दखल घेत माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी लक्ष वेधले . यावेळी भटवाडीतील नागरिक हर्षवर्धन धारणकर आदी उपस्थित होते.









