फिरोजपूर
पंजाबमधील काँग्रेसचे माजी आमदार कुलबीर सिंह जीरा यांना फिरोजपूर पोलिसांनी मंगळवारी पहाटे 5 वाजता अटक केली आहे. पोलिसांनी जीरा यांना घरातून पकडून नेले आहे. यानंतर त्यांना दंडाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आले, जेथून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. जीरा यांच्यावर शासकीय कामात अडथळे आणल्याचा आरोप आहे. जीरा यांना अटक झाल्याची माहिती कळताच त्यांच्या समर्थकांनी महामार्गावर निदर्शने केली आहेत.









