ऑनलाईन टीम / तरुण भारत :
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री अस्वस्थ वाटू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही वेळातच रुग्णालयाकडून जोशी यांच्या प्रकृतीसंदर्भात माहिती देण्यात येणार आहे.
मनोहर जोशी यांनी नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, खासदार, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री यासह लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशी पदंही भुषविली आहेत. वृद्धापकाळ आणि प्रकृतीच्या कारणास्तव ते मागील काही काळापासून राजकारणात सक्रिय नव्हते.