मणेराजूरी : गव्हाण रस्त्यावर मोटारसायकलची छोटाहत्ती टेम्पोला जोराची धडक होवून झालेल्या भीषण अपघातात मणेराजूरी विकास सोसायटीचे माजी चेअरमन विजय तानाजी जमदाडे ( वय ४० ) ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी नऊच्या दरम्यान गोडावूनजवळ झाला.
याबबतची घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की , विजय जमदाडे आपल्या मळ्यातून मणेराजूरीच्या दिशेने येत होते. यावेळी पाठीमागून जमदाडे यांची मोटारसायकल वेगाने या टेम्पोला धडकली. या भीषण धडकेत जमदाडे हे रस्त्यावर डोक्यावर पडले त्यातच त्यांच्या डोक्यातून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला.त्या अवस्थेतच त्यांना सांगलीला नेणेत आले परंतु त्यांची प्राणज्योत मालवली.
अतिशय मनमिळावू स्वभाव असणारे विजय जमदाडे यांनी विकास सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले होते. नुकत्याच झालेल्या विकास सोसायटी निवडणूकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते. त्यांच्या पश्चात आई – वडील, पत्नी, भाऊ, दोन लहान मुले असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच गावातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगली सिव्हील हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. त्यांचे निधनाने मणेराजूसह परिसरावर शोककळा पसरली असून गाव बंद ठेवून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. शवविच्छेदनानंतर त्यांचेवर अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









