नवी दिल्ली :
सीबीआयचे माजी संचलक विजय शंकर यांचे मंगळवारी सकाळीं निधन झाले आहे. त्यांच्या नेतृत्वात सीबीआयने आरुषी-हेमराज हत्या प्रकरण, मालेगाव स्फोटाचा तपास केला होता. विजय शंकर यांनी ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आहे. विजय शंकर यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे पार्थिव एम्सला दान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबाने घेतला आहे. उत्तरप्रदेश कॅडरचे 1969 च्या तुकडीचे निवृत्त आयपीएस अधिकारी विजय शंकर हे 2005-08 पर्यंत सीबीआयचे संचालक राहिले होते.









