वृत्तसंस्था / ऑस्टीन (अमेरिका)
व्यावसायिक मुष्टीयुद्ध क्षेत्रातील अमेरिकेचे माजी हेवीवेट चॅम्पियन जॉर्ज फोरमन यांचे वयाच्या 76 व्या वर्षी वृद्धापकालाने निधन झाले. वयाच्या 45 व्या वर्षी फोरमन यांनी हेवीवेट गटातील चॅम्पियनशिप पटकाविली होती.
1994 साली फोरमन यांनी आपल्या वयाच्या 45 व्या वर्षी तत्कालीन अव्वल मुष्टीयोद्धा मिचेल मुरेरचा हेवीवेट गटात पराभव करुन चॅम्पियनशिपचा किताब मिळविला होता. मुरेरने तत्पूर्वी दोनवेळा हेवीवेट गटातील चॅम्पियनशिप बेल्ट मिळविले होते. फोरमन यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. 1973 साली फोरमनने जो फ्रेजरचा पराभव करत हेवीवेट गटात अजिंक्यपद मिळविले होते. मेक्सीकोमध्ये 1968 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करताना फोरमनने मुष्टीयुद्ध प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. फोरमन यांच्या पश्चात 5 कर्ते चिरंजीव आणि 7 मुली असा परिवार आहे. जागतिक मुष्टीयुद्ध क्षेत्रातील मान्यवरांनी फोरमन यांना श्रद्धांजली वाहिली.









