जे आपल्या कर्माने मरणार आहेत त्यांना धर्माने मारू नका अशी बाळासाहेब ठाकरेंची शिकवण असून यापुढे जे घडणार आहे ते फक्त महाराष्ट्राने पहात रहावे अशी खोटक प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. भाजपाचे माजी खासदार किरिट सोम्मया यांचे आक्षेपार्ह व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर हे व्हिडीयो बाहेर आल्याने राज्याचे राजकारण तापले आहे. किरीट सोमय्या यांनी याबाबतचे पत्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले असून या प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही यावर किरिट सोमय्या यांच्यावर टिका केली आहे. त्यांनी विधान परिषदेत यावर आवाज उठवून त्या व्हिडीयोचे पुरावे म्हणून पेन ड्राईव्ह विधानपरिषदेच्या अध्यक्षा निलम गोऱ्हे यांच्याकडे सुपुर्द केला.
आपल्या ट्विटर हँडलवर ट्विट पोस्ट करताना संजय राऊत म्हणाले, “आमच्यावर आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. ते नेहमी असं सांगायचे, जो आपल्या कर्माने मरणार आहे त्याला धर्माने मारू नका…बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे घडत आहे….यापुढे देखील बरंच काही घडणार आहे….यापुढे जे जे होईल ते ते पाहत राहावे…जय महाराष्ट्र!” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. संजय राउतांनी हा खोचक टोला मारून किरिट सोमय्या यांना अप्रत्यक्ष टिका केली आहे. या ट्वीटवर संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.
यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मेन्शन केलं आहे. राऊत यांनी यात ट्वीटमध्ये सोमय्या यांचा उल्लेख केलेला नाही. परंतु या ट्वीटवर सोमय्या प्रकरणाशी संबंधित कमेंट्स दिसत आहेत.