कौशल्य विकास घोटाळाप्रकरणी कारवाई : पुत्र नारा लोकेशलाही सीआयडीने घेतले ताब्यात
टीडीपी कार्यकर्त्यांचा कारवाईला तीव्र विरोध, चंद्राबाबूंच्या समर्थकांची पोलिसांशी झटापट
वृत्तसंस्था/ अमरावती
आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवारी सकाळी 6 वाजता नंदयाल शहरातून अटक करण्यात आली. कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी त्यांच्याविऊद्ध गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. हे प्रकरण 550 कोटींहून अधिक ऊपयांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे. याप्रकरणी टीडीपीचे आमदार आणि माजी मंत्री गंता श्रीनिवास राव आणि त्यांचा मुलगा गंता रवितेजा यांनाही अटक झाली आहे.
टीडीपीचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास महामंडळाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या 550 कोटी ऊपयांच्या फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे, असे राज्याचे सीआयडी प्रमुख एन. संजय यांनी शनिवारी सांगितले. संपूर्ण योजनेमागील मुख्य सूत्रधारांनी बनावट कंपन्यांद्वारे सार्वजनिक निधी सरकारकडून खासगी संस्थांकडे हस्तांतरित केल्याचा प्रकार उघड झाला असून चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वात हा घोटाळा घडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पहाटेच्या सुमारास बेधडक कारवाई
चंद्राबाबू नंदयाल शहरात एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर बसमध्ये आराम करत असताना त्यांना अटक करण्यात आली. कर्नूल रेंजचे डीआयजी रघुरामी रे•ाr यांच्या नेतृत्वाखाली सीआयडी अधिकारी आणि नंदयाल जिल्हा पोलीस पहाटे 3 वाजता नायडू यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी नायडू यांना अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र पक्षाच्या समर्थकांनी त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. यादरम्यान पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. वाढत्या तणावामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अटक बेकायदेशीर : टीडीपी
चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर पक्षाचे खासदार केसिनेनी श्रीनिवास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सदर कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेकडे लक्ष वेधण्याची विनंती करतानाच माजी मुख्यमंत्र्यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली त्याबाबतही त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. श्रीनिवास यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. अटकेनंतर काही तासांनंतर पत्रकारांशी बोलताना चंद्राबाबू नायडू यांनी आपण काहीही चुकीचे केले नसल्याचा दावाही केला आहे.
मला रोखले जाऊ शकत नाही!
‘मी गेल्या 45 वर्षांपासून मी नि:स्वार्थपणे तेलुगू लोकांची सेवा केली आहे. तेलुगू लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मी माझ्या प्राणाची आहुती देण्यास तयार आहे. पृथ्वीवरील कोणतीही शक्ती मला सेवा करण्यापासून रोखू शकत नाही. मी लोकांना आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो, आज मी काहीही चुकीचे केलेले नाही. पण मध्यरात्री तपास अधिकाऱ्यांनी कोणताही पुरावा न दाखवता मला अटक केली’, अशी माहिती चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.

विजयवाडा न्यायालयात हजर
अटकेनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नंदयाल ऊग्णालयात नेण्यात येणार होते, मात्र त्यांनी नकार दिल्यानंतर शिबिराच्या ठिकाणीच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. येथून त्यांना विजयवाडा येथे न्यायालयात हजर करण्यात आले. याचदरम्यान आंध्रप्रदेश पोलिसांनी चंद्राबाबू यांचा मुलगा नारा लोकेश याला पूर्व गोदावरी जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे.
2021 मध्ये एफआयआर
कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने 9 डिसेंबर 2021 रोजी एफआयआर नोंदवला होता. यामध्ये 25 जणांना आरोपी करण्यात आले होते. मात्र, या एफआयआरमध्ये नायडू यांचे नाव नव्हते. यावषी मार्चमध्ये सीआयडीने कौशल्य विकास घोटाळ्याची चौकशी सुरू केली. तपासात समोर आलेल्या गोष्टींच्या आधारे चंद्राबाबू यांना अटक करण्यात आल्याचा सीआयडीचा दावा आहे.
कौशल्य विकास घोटाळ्याची व्याप्ती
2016 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बेरोजगार तऊणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी आंध्रप्रदेश राज्य कौशल्य विकास महामंडळाची स्थापना केली होती. टीडीपी सरकारने 3300 कोटी ऊपयांच्या या प्रकल्पासाठी सीमेन्स इंडस्ट्री सॉफ्टवेअर इंडिया लिमिटेड आणि डिझाईन टेक सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या समूह कंपन्यांसोबत सामंजस्य करार केला होता. या कराराअंतर्गत, सीमेन्स इंडस्ट्री सॉफ्टवेअर इंडिया 3300 कोटी ऊपये खर्चून कौशल्य विकासासाठी सहा उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार होती. प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या 10 टक्के रक्कम राज्य सरकारने भरायची होती, तर उर्वरित रक्कम सीमेन्स आणि डिझाईन टेकला सहाय्य म्हणून द्यायची होती.









