वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग
दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू माईक प्रोक्टर यांचे वयाच्या 77 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली.
दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या इतिहासामध्ये माईक प्रोक्टर हे सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून ओळखले गेले. 1970 आणि 1980 च्या दशकामध्ये प्रोक्टर यांनी 7 कसोटीत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले. तसेच त्यांनी 401 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. क्रिकेट क्षेत्रातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक, क्रिकेट प्रशासक, निवड समिती सदस्य, समालोचक तसेच इलाईट आयसीसीचे सामनाधिकारी अशी विविध पदे भूषवली.









