अनेकवेळा निवेदने देऊनही दुर्लक्ष, वाहनधारकांना मन:स्ताप
प्रतिनिधी/ बेळगाव
उचगाव-कोवाड मार्गावर अतिवाड क्रॉसनजीक अर्ध्या किलोमीटर रस्त्याची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. यासाठी भीक मागो आंदोलन, रास्ता रोको आणि अनेकवेळा निवेदनेही देण्यात आली. मात्र, सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधींना याबाबत कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर कर्नाटक हद्दीतील अतिवाड क्रॉसपर्यंत रस्ता सुरळीत आहे. शिवाय महाराष्ट्र हद्दीतील रस्ताही सुरक्षित आहे. केवळ कर्नाटक सीमा हद्दीतील अतिवाड क्रॉसपासून अर्धा किलोमीटरच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या ख•dयांमुळे वाहने चालविणे जीवघेणे ठरू लागले आहे. सध्या होत असलेल्या पावसामुळे या ख•dयांतून पाणी साचले आहे. रात्रीच्या वेळी लहानसहान अपघातांनाही सामोरे जावे लागत आहे. या मार्गावर कोवाड, नेसरी, गडहिंग्लज आदी वाहनधारकांची सतत वर्दळ असते. मात्र, सध्या रस्त्याची पूर्णपणे दूरवस्था झाल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी धोक्याचा बनला आहे.
मागील आठवड्यात सीमाभागातील रस्ता ख•ामुक्त करा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदन सादर केले होते. शिवाय रास्ता रोको करून आंदोलनही हाती घेतले होते. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने रस्ताकामाला सुरुवात करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे वाहनधारकांची दैनंदिन कसरत सुरू आहे.









