सावंतवाडी / प्रतिनिधी
The hunger strike of the villagers in Sawantwadi started for the demand of establishing Madkhol Devasthan Committee!
माडखोल गावातील देवस्थान जमीन विक्री व्यवहाराची चौकशी सुरू आहे असे असताना विद्यमान कमिटीतील सदस्य जमीन व्यवहारात होते. त्यामुळे नवीन कमिटी करताना या जमीन विक्री व्यवहारातील सदस्यांना कमिटी स्थान देऊ नये .तसेच स्थानिक देवस्थान समिती अद्याप पर्यंत ग्रामपंचायत ने गठीतच केले नाही. ती तात्काळ गठीत करावी. या मागणीसाठी सावंतवाडीतील देवस्थान कार्यालय आत्मेश्वर मंदिर जवळ माडखोल येथील सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ , यांच्या नेतृत्वाखाली संतोष म्हालटकर, हरीश लाताये, अभिजित घाडी, अशोक मेस्त्री, जानू पाटील, चंद्रकांत परब गुरुजी, रमी मेस्त्री,ग्रामपंचायत सदस्य संजय गवस वैगरे आदींनी आज उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला अनेक आणि पाठिंबाही दिला आहे. आज दिवसभर उपोषण सुरूच आहे. माडखोल गावातील देवस्थान जमीन विक्री मोठ्या प्रमाणात झाली आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. या जमीन विक्री व्यवहाराबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीनंतर सदर जमीन व्यवहाराची चौकशी सुरू आहे. सदर जमीन व्यवहाराची चौकशी सुरू असताना या जमीन व्यवहारात जे देवस्थान कमिटीचे सदस्य गुंतले होते. ते नवीन कमिटीत समाविष्ट होऊ पाहत आहेत. या नवीन कमिटीमध्ये जे जमीन व्यवहारात गुंतले आहेत. त्यांना समाविष्ट करू नये .तसेच गेले. कित्येक महिने स्थानिक देवस्थान कमिटी गठीत करण्याचे शासन निर्णय असताना ग्रामपंचायत कार्यालयाकडून देवस्थान कमिटी गठीत करण्यास वेळ काढूपणा केला जात आहे. नवीन देवस्थान स्थानिक कमिटी गटीत करावी. व त्या नवीन कमिटीमध्ये नवीन सदस्यांचीच नेमणूक करण्यात यावी .या मागणीसाठी आज सोमवार सकाळपासून सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ विशाल राऊळ आधी कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत आज रात्रोपर्यंत उपोषण सुरूच होते जोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयाकडून नवीन देवस्थान कमिटी गठीत करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवणार आहोत .असे त्यांनी स्पष्ट केले.









