सात दिवसानंतरही थांगपत्ता नाही : मिरामार येथे सापडली कार
फोंडा : फोंडा येथील वनखात्याचे अधिकारी (आरएफओ) धाराजीत अनंत नाईक हे गूढरित्या बेपत्ता झाले असून सात दिवसांच्या शोधकार्यानंतरही अद्याप त्यांचा थांगपत्ता लागू शकलेला नाही. त्यांच्या अचानकपणे बेपत्ता होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी मागील काही दिवसांपासून ते तणावाखाली होते, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले.
धाराजीत हे गेल्या 11 जुलैंपासून बेपत्ता आहेत. त्यांची स्वीफ्ट कारगाडी मिरामार येथील रेसिडेन्सीजवळ पार्क केलेली आढळून आली आहे. तसेच त्यांचा मोबाईल फोनही त्या दिवसापासून बंद आहे. धाराजीत हे नागेशी बांदोडा येथील रहिवासी असून सध्या वनखात्याच्या सामाजिक वनीकरण उसगांव रेंजचा ताबा त्यांच्याकडे आहे. धाराजीत हे मंगळवार 11 रोजी रात्री 10 वा. कॉर्टसवर जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर रात्री शेवटचा फोन त्यांनी आपल्या मुलाला केला होता. बेपत्ता होण्यापूर्वी मिरामार येथे चालत जाताना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांच्या हालचाली आढळल्याने त्याच दिशेने पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. पार्क केलेल्या कारगाडीत त्यांचे पाकिट व चप्पल आढळले आहे. सध्या मिरामार परिसरासह अन्य विविध माध्यमांतून त्यांचा शोध जारी आहे.
धाराजीत हे गेल्या पंचवीस वर्षांपासून वनखात्याच्या सेवेत आहेत. सुऊवातीला फॉरेस्टर, नंतर डेपिट्यू आरएफओ व दोन वर्षांपूर्वी त्यांना आरएफओ म्हणून बढती मिळाली होती. सेवा काळात त्यांनी वन्यजीव विभागासह, संशोधन व अन्य काही विभागांचा ताबा सांभाळला आहे. त्यांच्या अशा अचानकपणे बेपत्ता होण्यामागे विविध तर्कवितर्क सुऊ आहेत. गेल्या जून महिन्यात ते असेच घरी न सांगता निघून गेले होते. पण दोन दिवसांनी पुन्हा परतले होते, अशी माहिती त्यांच्या एका निकटवर्तीयाकडून मिळाली आहे.









