पर्वरी (प्रतिनिधी)
विद्याप्रबोधिनी वाणिज्य शिक्षण संगणक आणि व्यवस्थापन महाविद्यालयातील निसर्ग क्लब व राष्ट्रीय सेवा योजना विभाग तसेच वनविभाग गोवा सरकार आणि पेन्ह दि फ्रांक ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पर्यटन, माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन अशोक खवटे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भूषण भावे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणामध्ये पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर पेन्हा दी फ्रान्कचे सरपंच स्वप्निल चोडणकर यांनीही जागतिक तापमान वाढ व पर्यावरण याविषयी माहिती सांगितली. तद्नंतर वनविभागाचे आर एफ ओ तुकाराम खरबे यांनी वृक्षारोपण व त्याचे महत्त्व पटवून दिले. पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रोहन खंवटे यांनी आपल्या भाषणात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्याचे महत्त्व याविषयी माहिती दिली. विद्याप्रबोधिनी महाविद्यालय व धवरुख या संस्थेच्या माध्यमातून सुमारे दीड हजार वृक्षांचे रोपण आत्तापर्यंत करण्यात आलेले आहे. तसेच येत्या काळामध्ये धवरूख व महाविद्यालयाच्या सामंजस्य कराराअंतर्गत दोन हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. सदर कार्यक्रमासाठी पेन्ह दि फ्रान्क ग्रामपंचायत सदस्य विश्रांती राजकुमार देसाई तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रबोधन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय वालावलकर , संस्थापक सदस्य दत्ता नाईक तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल ठोसरे आणि वाणिज्य विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. उज्वला हणजूनकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पिंकेश दाभोळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. उद्धव पोळ यांनी केले.









