उचगाव /वार्ताहर
मनुष्याच्या जीवनामध्ये निसर्ग आणि झाडे हा महत्त्वाचा दुवा आहे. वृक्षाशिवाय, निसर्गाशिवाय आणि त्यांनी पुरवत असलेल्या ऑक्सिजनशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यामध्ये सदोदित रोपांची लागवड करा आणि निसर्गाचा समतोल राखा, असे मनोगत तुरमुरी येथील रामलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश चलवेटकर यांनी व्यक्त केले. ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण समारंभात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी ग्रा.पं. सदस्य सुरेश राजूकर होते.
वनमहोत्सव कार्यक्रम हभप पुंडलिक बांडगे गुऊजी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून हभप लक्ष्मण बांडगे, हभप राजू बांडगे, हभप अर्जुन कालभंट, हभप वैजनाथ गोजगेकर, हभप महेश बांडगे, हभप यल्लाप्पा खांडेकर, हभप परशराम जाधव उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक एन.एम.बोकडे यांनी केले. यावेळी वनमहोत्सवाचे महत्व उपस्थित मान्यवरांनी सर्वांना सांगितले. सूत्रसंचालन एन. वाय. पाऊसकर यांनी तर एम. टी. बेळगावकर यांनी आभार मानले.









