कुडाळ प्रतिनिधी
वाई तालुक्यातील ग्रामीण भागात अवैध लाकुडमालाची वाहतूक करणाऱ्यावर वनविभागाची कडक कारवाई सविस्तर वृत्त असे की दि. 5 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पुणे-सातारा हायवेवरील मौजे पाचवड गावच्या हद्दीत तपासणी करीत असता स्वप्नील प्रकाश बांदल रा. अमृतवाडी ता. वाई जि.सातारा हे टाटा कंपनीचा क्र.MH-11 AL 5988 या क्रमांकाच्या आयशर टेम्पो मधून रायवळ प्रजातीचा अनगड लाकुडमाल 23.55 घ.मी. विनापास, विनापरवाना वाहतूक करीत असताना पकडला त्यानुसार अवैध वाहतूक केल्याप्रकरणी भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 41(2)ब चे उल्लंघन झालेने वनरक्षक बेलमाची यांनी विनापरवाना वाहतुकीचा वन गुन्हा नोंद केला आहे. सदर कारवाई मध्ये सुमारे चार लाख नऊ हजार त्रेचाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा श्रीमती. आदिती भारव्दाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वाई स्नेहल मगर, वनपाल भुईंज डी.एन.व्हनमाने, वनरक्षक बेलमाची एच व्ही शिंदे,वनरक्षक बोपेगाव व्ही एम चौरे यांनी पार पाडली.









