डॉ .जयेंद्र परुळेकर, संदीप सावंत यांचा आरोप
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी उच्च न्यायालयात वाईल्ड लाईफ कॉरिडोर संदर्भात खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे .सावंतवाडी आणि दोडामार्ग मधील प्रस्तावित 49 मायनिंग प्रकल्प वाचवण्यासाठी त्यानी दबावापोटी हे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर संदीप सावंत यांनी केला आहे
सावंतवाडी दोडामार्ग भाग पश्चिम घाटात येतो. सावंतवाडी दौरा मार्गात मोठ्या प्रमाणात जैवविविधता आहे .माधव गाडगीळ समितीने सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याचा समावेश इकोसिन्सिटीव झोन मध्ये केला होता. त्यानंतर कस्तुरीरंगन समितीने दोडामार्ग तालुका इकोसिन्सिटीव झोन मधून वगळला. परंतु वनशक्ती फाउंडेशनने तत्पूर्वी आंबोली ते मांगेली पर्यंतचा पट्टा वाईल्ड लाईफ कॉरिडोर असल्याने इकोसिन्सिटीव झोन जाहीर करावा अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात 2013 मध्ये सादर केली होती. तर सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील 25 गावांच्या ग्रामसभेत ही गावे इकोसिंसीटिव्ह झोन म्हणून समाविष्ट करावीचा ठराव ग्रामसभेत घेतला होता .यामुळे प्रस्तावित मायनिंग प्रकल्पांना चपराक लागली होती. तर उच्च न्यायालयाने याचिकेच्या अनुषंगाने दोडामार्ग तालुक्यात वृक्षतोड बंदी लागू केली होती .यासंदर्भात 2013 मध्ये उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. यापूर्वीचे वन उपवनसंरक्षक नरेश झुरमुरे तसेच कोल्हापूर वनसंरक्षक यांनी इकोसिन्सिटीव झोन संदर्भात सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र सध्याचे सरकार मायनिंग होण्याच्या बाजूने आहे .त्यामुळे या भागात पुन्हा मायनिंग करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. यादरम्यान उच्च न्यायालयाने दोडामार्ग तालुका इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले होते.
यासंदर्भात सावंतवाडीचे उपवनसंरक्षक नवल किशोर रेड्डी यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. परंतु हे प्रतिज्ञापत्र खोटे आहे. न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन त्यांनी केले आहे. सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात प्रस्तावित 49 मायनिंग प्रकल्प होण्यासाठी उपवनसंरक्षक यांनी दबावापोटी हे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले आहे. मात्र, आम्ही या संदर्भात उच्च न्यायालयात बाजू मांडून हे प्रतिज्ञापत्र खोटे कसे आहे हे सिद्ध करू असे परुळेकर, सावंत यांनी सांगितले. सावंतवाडी ,दोडामार्ग तालुक्यात भेकुर्ली ,खडपडे ,कुंभवडे या गावात वाघ असल्याचे उपवनसंरक्षक सांगत आहेत.अन्य गावात वाघाचे दर्शन लोकांना होते असे असताना वाघ नसल्याचे त्यांनी म्हटले आहे . वनविभागाने 300 ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. सुमारे दहा हजार वेळा हे कॅमेरे ट्रॅप झाले. या कॅमेरात केवळ तीन वाघ कैद झाले आहेत. त्यामुळे हे कॅमेरे कुठे बसवले असा प्रश्न निर्माण होत आहे. वाघ दिसू नये अशा पद्धतीने हे कॅमेरे बसवण्यात आले असावे यासंदर्भात आम्ही वनविभागाकडून माहिती घेऊ. हे पैसे जनतेचे आहेत. त्यामुळे त्याची माहिती मिळणे आवश्यक आहे. असेही परुळेकर म्हणाले. उपवनसंरक्षक नव किशोर रेड्डी हे वनरक्षक आहेत की वनभक्षक असा आरोप या दोघांनी केला . सावंतवाडी दोडामार्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. पर्यावरण राखण्याची गरज आहे त्यासाठी रेड्डी यांनी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु त्यांनी तसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. ते दबावाखाली वागत आहेत. परंतु ,आमचा मायनिंग विरोधी लढा चालूच राहील. यासंदर्भात गावागावात जाऊन जनजागृती करू . गेली पंधरा वर्षे आम्ही या संदर्भात लढा देत आहोत. त्याला जनतेचे पाठबळ आहे असे दोघांनी स्पष्ट केले.









