कोल्हापूर
प्रशांत कोरटकर ला न्यायालयाकडून तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर पुढील तपास सुरू आहे. प्रशांत कोरटकर च्या आवाजाचे सॅम्पल घेण्यासाठी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात दोन जणांची फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे. सोबत जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण देखील उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याबाहेर राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.








