नवी दिल्ली / वृत्तसंस्था
परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर बुधवारी मालदीव आणि श्रीलंका दौऱयावर रवाना झाले. ते 20 जानेवारीपर्यंत या दोन्ही देशांमध्ये विविध नेत्यांच्या भेटीगाठी घेत द्विपक्षीय संबंधांना चालना देणार आहेत. मालदीवच्या भेटीदरम्यान ते राष्ट्रपती मोहम्मद सोलिह यांची भेट घेतील. तसेच मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद यांच्याशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा करतील. या भेटीमध्ये परराष्ट्रमंत्री जयशंकर मालदीवच्या सामाजिक-आर्थिक विकासात योगदान देणाऱया द्विपक्षीय विकास सहकार्याशी संबंधित कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. मालदीवचा दौरा आटोपून ते श्रीलंकेला जाणार असून तेथेही द्विपक्षीय संबंध बळकट करण्याच्यादृष्टीने भेटीगाठी घेणार आहेत.









