मुंबई :
जूनमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 8749 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. मे महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. अमेरिका आणि चीन यांच्यामधील व्यापार तणाव त्याचप्रमाणे बाँड यिल्डमध्ये झालेली वाढ यामुळे विदेशी गुंतवणूकदार काहीसे गोंधळाच्या स्थितीत आहेत. मे महिन्यामध्ये एकंदर 19,860 कोटी रुपयांची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात केली होती. एप्रिलमध्ये 4223 कोटी रुपये शेअर बाजारात गुंतवले गेले होते.









