मुंबई
सप्टेंबर महिन्यामध्ये विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 7945 कोटी रुपये शेअरबाजारातून काढून घेतले आहेत. जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात विदेशी गुंतवणूकदार बाजारातून गुंतवणूक काढून घेण्यामध्येच धन्यता मानत आहेत. गेल्या ऑगस्ट महिन्यात पाहता 34 हजार 990 कोटी रुपये बाजारातून काढण्यात आले आहेत. 19 सप्टेंबर तारखेपर्यंत पाहता विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी 7945 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. दुसरीकडे सदरच्या आठवड्यामध्ये यांच्याकडून 900 कोटी रुपयांचे समभाग खरेदी करण्यात आले आहेत. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने 25 बेसिस पॉईंट्सची व्याज दरात कपात केलेली आहे. या निर्णयानंतर शेअर बाजारात 900 कोटी रुपयांचे समभाग विदेशी गुंतवणूकदारांकडून खरेदी केले गेले आहेत.









