नवी दिल्ली :
जागतिक व्यापाराच्या तणावाखाली महिन्यातील पहिल्या आठवड्यामध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून 7300 कोटी रुपये काढून घेतले आहेत. अमेरिकेने सत्ता स्थापनेनंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी विविध देशांना व्यापारी कराची घोषणा करत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर ट्रम्प यांनी दोन देशांवरील व्यापार कराबाबत अंमलबजावणी लांबणीवर टाकली आहे. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जानेवारी महिन्यात 78 हजार 27 कोटी रुपये बाजारातून काढले होते. यापूर्वी डिसेंबर महिन्यामध्ये मात्र विदेशी गुंतवणूकदारांनी 15,446 कोटी रुपये बाजारात गुंतवले होते.









