नवी दिल्ली :
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी जुलैमध्ये आतापर्यंत 5524 कोटी रुपये बाजारातून काढून घेतले आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार शुल्काच्या बाबतीमध्ये असलेला तणाव त्याचप्रमाणे इतर कंपन्यांच्या तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदार काहीसे सावध राहिलेले पाहायला मिळाले. 18 जुलैपर्यंत पाहता 5524 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून काढून घेतले आहेत. जूनमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 14590 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.









