ऑगस्टमधील कामगिरीची माहिती
वृत्तसंस्था / मुंबई
ऑगस्ट महिन्यामध्ये पाहता विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 22,751 कोटी रुपये बाजारातून काढले आहेत. ऑगस्टमध्ये भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या महिन्यात घसरणीत असलेला पाहायला मिळाला. सेन्सेक्स निफ्टी समवेत सर्वप्रमुख निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले. ऑगस्टमध्ये पाहता सेन्सेक्स 1.7 टक्के आणि निफ्टी 1.4 टक्के इतका घसरणीसोबत बंद झाला. निफ्टी मिडकॅप-100 2.9 टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप -100 4.1 टक्के इतका कमकुवत झालेला होता. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये पाहता ऑक्टोबर-फेब्रुवारी 2025 नंतर सर्वाधिक मासिक घसरण पाहायला मिळाली. अमेरिकेने सुरुवातीला भारतीय वस्तूंवर 25 टक्के व्यापारी शुल्क जाहीर केले होते पण याच दरम्यान भारताला रशियाकडून तेल खरेदी करू नये असे सूचित केले होते. मात्र भारताने ही सूचना धुडकावत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी चालूच ठेवली. या रागाच्या भरात अमेरिकेने भारतावरचे व्यापारी शुल्क 50 टक्के इतके केले आणि ते 27 तारखेपासून अंमलात आले. कपडे, रत्न आणि दागिने त्याचप्रमाणे समुद्री उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता सांगितली जात आहे. याच दरम्यान विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी 22751 कोटी रुपये शेअर बाजारातून काढून घेतले आहेत. मात्र दुसरीकडे देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 83,341 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.








