वृत्तसंस्था/ मुंबई
गेल्या चार सत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 10 हजार 355 कोटी रुपये बाजारातून काढले आहेत. अमेरिकेकडून लादल्या जाणाऱ्या आयात करासंदर्भातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विदेशी गुंतवणूकदारांनी मागच्या चार सत्रांमध्ये विक्रीवर भर दिला होता. एकंदर 4 सत्रामध्ये पाहता 10,355 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 34 हजार 574 कोटी रुपये बाजारातून काढले होते. या मागच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तब्बल 78 हजार 27कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते.









