मुंबई :
विदेशी गुंतवणुकदारांनी आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 2 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारताची अर्थव्यवस्था मात्र वेगावर स्वार राहिलेली पहायला मिळाली. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जास्तीतजास्त गुंतवणूक करण्यात रस घेतला होता. 2023-24 आर्थिक वर्षात भारतीय शेअर बाजारात विदेशी गुंतवणुकदारांनी एकंदर 2लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकची गुंतवणूक केली आहे. आर्थिक स्थिरतेसह धोरणात्मक सुधारणांमुळे भारताची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होते आहे. हेच पाहून विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारात गुंतविण्याप्रती आकर्षित होत आहेत. पुढील काळामध्ये जागतिक अस्थिरतेमुळे भारतावरसुद्धा काही प्रमाणात दबाव राहू शकतो, असेही काही तज्ञांना वाटते आहे.









