नवी दिल्ली:
विदेशी गुंतवणूकदारांनी मेमध्ये 14167 कोटी रुपयांची शेअरबाजारात गुंतवणूक केली आहे. विदेशी पोर्टफोलीओ गुंतवणूकदारांनी मेमध्ये पुन्हा गुंतवणुकीमध्ये रस दाखवला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणातही गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर विश्वास व्यक्त केला आहे. एप्रिल महिन्यामध्ये 4223 कोटी रुपयांची गुंतवणूक बाजारात झाली होती. साधारण तीन महिन्यांच्या नंतर विदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीला पुन्हा सुरुवात केली. मार्च महिन्यात 3973 कोटी रुपये बाजारातून गुंतवणूकदारांनी काढले होते. फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक 34,574 कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढले होते. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये पाहता विदेशी गुंतवणूकदारांचा कल पैसे काढून घेण्यावर अधिक दिसून आला. 9 मे पर्यंत पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 14,167 कोटी रुपये गुंतवले आहेत.









