मुंबई :
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी एप्रिलमध्ये 4 हजार कोटी रुपये बाजारात गुंतवले आहेत. ही गुंतवणूक पाहता विदेशी गुंतवणूकदारांचा कल पुन्हा भारतीय शेअरबाजारात वाढतो आहे. नॅशनल सेक्योरिटीज डिपॉझीटरी लिमिटेडकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार संपूर्ण एप्रिल महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी 4223 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासह पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांची गुंतवणूक सकारात्मक राहिली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर दिला होता.
जानेवारी, फेब्रुवारी नकारात्मक
जानेवारीत 78,027 कोटी रुपये आणि फेब्रुवारीत 34,574 कोटी बाजारातून काढले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांवर परिणाम दिसला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स 259 अंकांनी वाढत 80,501 अंकांवर बंद झा7ला.









