वृत्तसंस्था/ मुंबई
मे महिन्यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 19860 कोटी रुपयांची भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे. जागतिक आर्थिक स्थिती उत्तम राहिल्याचा परिणाम गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यावर भर दिला होता.
तसे एप्रिल महिन्यामध्ये पाहता 4223 कोटी रुपयांची गुंतवणूक शेअर बाजारात झाली होती. मात्र यापूर्वीच्या तीन महिन्यात गुंतवणूक काढून घेण्यावरच विदेशी गुंतवणूकदारांचा कल होता. विदेशी गुंतवणूकदारांनी मार्च महिन्यात 3973 कोटी रुपये काढून घेतले होते. याच्या मागच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत तर तब्बल 34574 कोटी रुपये बाजारातून काढून घेण्यात आले होते. आगामी काळामध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा कल भारतीय बाजारात गुंतवणूकीकडे राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.









