वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय शेअर बाजारामध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी जूनमध्ये एकंदर 14,590 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे दिसून आले आहे. जागतिक स्तरावरती उत्तम स्थिती आणि भूराजकीय तणावात आलेली शिथीलता यामुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. जूनमध्ये पाहता एकंदर 14,590 कोटी रुपयांची गुंतवणूक विदेशी गुंतवणूकदारांनी केली असून सलग तिसऱ्या महिन्यामध्ये गुंतवणूक करण्यात आली आहे. जुलैमध्ये पाहता विदेशी गुंतवणूकदारांनी पहिल्या आठवड्यामध्ये 1421 कोटी रुपयांचे समभाग विक्री केले. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प व्यापार शुल्काची घोषणा करणार असून त्यावर गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.









