नवी दिल्ली :
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 5 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात 4.038 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे.
4.038 अब्ज डॉलर्सच्या वाढीसह देशाचा विदेशी चलन साठा 698.268 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. सुवर्णसाठ्यातही चांगली वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. याआधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 3.51 अब्ज डॉलर्सने वाढत 694.23 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. 5 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात सुवर्णसाठा 3.53 अब्ज डॉलर्सने वाढून 90.299 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. देशाचा चलन मालमत्ता साठा 540 दशलक्ष डॉलर्सने वाढत 584.477 अब्ज डॉलर्सवर पोहचला.









