वृत्तसंस्था/ मुंबई
आठ ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 4.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. 8 ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 4.7 अब्ज डॉलर्सने वाढत 693.62 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. याच दरम्यान विदेशी चलन मालमत्ता साठ्यामध्ये 2.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. या आधीच्या आठवड्यात विदेशी चलन साठ्यामध्ये 9 अब्ज डॉलरची घसरण नोंदवली गेली होती. एक लक्षात घ्या की सप्टेंबर 2024 मध्ये विदेशी चलन साठ्याने 705 अब्ज डॉलर्सचा विक्रमी स्तर गाठला होता. याच दरम्यान सदरच्या आठवड्यात रुपया जवळपास 0.12 टक्के इतका घसरलेला होता. याच दरम्यान सुवर्ण राखीव साठा 2.1 अब्ज डॉलर्सने वाढलेला दिसून आला.









