नवी दिल्ली :
21 मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 4.53 अब्ज डॉलर्सने वाढून 658.8 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँकेने ही माहिती दिली आहे. मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये देशाचा विदेशी चलन साठा 705 अब्ज डॉलर्स या सर्वकालिक विक्रमावर पोहोचला होता.









