मुंबई :
4 एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 10.87 अब्ज डॉलर्सने वाढून 676.27 अब्ज डॉलर्सवर पोहोचलाय. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आधीच्या म्हणजे 28 मार्चच्या संपलेल्या आठवड्यातही विदेशी चलन साठ्यामध्ये वाढ झालेली दिसून आली आहे. भारताचा विदेशी चलन साठा जवळपास पाच महिन्यांच्या उच्चांकावर पहायला मिळाला आहे. देशाचा सुवर्ण साठा सुद्धा 4 एप्रिलच्या आठवड्यामध्ये 1.5 अब्ज डॉलर्सने वाढून 79.36 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता.









