रिझर्व्ह बँकेची माहिती : चलन साठा 688 अब्ज डॉलर्सवर
वृत्तसंस्था/मुंबई
भारताच्या विदेशी चलन साठ्यात 1 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यामध्ये 9.3 अब्ज डॉलर्सची घसरण झालेली असून या योगे विदेशी चलन साठा 688 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. बँकेनुसार ही घसरण गेल्या आठ महिन्यांमध्ये पाहता सर्वाधिक नोंदली गेली आहे. एकूणच साठ्यामध्ये घसरण झाल्याने विदेशी चलन मालमत्ता साठ्यावरही परिणाम दिसून आला आहे. जो 7.3 अब्ज डॉलरने कमी झाला आहे. चलन साठ्यामध्ये घसरणीचे मुख्य कारण डॉलरची विक्री हे सांगितले जात आहे. सदरच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने रुपयावरील दबाव कमी करण्यासाठी 6.9 अब्ज डॉलरची विक्री केली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर 25 टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये रुपया जवळपास 87 प्रति डॉलरचा स्तर पार करु शकला आहे. याचबरोबर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनीसुद्धा भारतीय बाजारातून गुंतवणूक काढून घेण्याचा सिलसिला कायम ठेवला आहे.









