नवी दिल्ली :
देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 3 जानेवारीला संपलेल्या आठवड्यामध्ये 5.69 अब्ज डॉलरची घट झाली आहे. त्या आठवड्यात विदेशी चलन साठा घसरणीसह 634.58 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. या आधीच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 4.11 अब्ज डॉलर्सने घटला होता आणि तो 640.28 अब्ज डॉलर्सवर घसरला होता. विदेशी चलन साठ्यामध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये सातत्याने घसरण पाहायला मिळते आहे. रुपयाच्या चढ-उतारामुळे गुंतवणूकदार काहीसे सावधगिरी बाळगत आहेत. याचप्रमाणे देशाचा सुवर्ण साठा 82.4 कोटी डॉलरने वाढून 67.09 अब्ज डॉलर्सवरती पोहोचला होता.









