नवी दिल्ली :
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 1.88 अब्ज डॉलरची घसरण झाल्याची बाब समोर आली आहे. देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये गेले काही आठवडे सातत्याने घसरण अनुभवायला मिळाली आहे. 17 जानेवारीला संपलेल्या आठवड्यात देशाचा विदेशी चलन साठा 1.88 अब्ज डॉलर्सने कमी होत 623.983 डॉलर्सवर घसरला आहे. या आधीच्या म्हणजे 10 जानेवारीच्या आठवड्यामध्ये सुद्धा विदेशी चलन साठा 8.714 अब्ज डॉलर्सने घटून 625.871 अब्ज डॉलर्सवर राहिला होता. रुपयाच्या अस्थिरतेमुळे सातत्याने विदेशी चलन साठ्यावर परिणाम दिसून येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संदर्भात विविध पावले उचलत आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार 17 जानेवारीच्या आठवड्यात देशाचा सुवर्णसाठा 1.063 दशलक्ष डॉलर्सने वाढून 68.947 अब्ज डॉलर्सवर पोहोचला.









