नवी दिल्ली :
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 30 मे संपलेल्या आठवड्यामध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. बँकेच्या माहितीनुसार 30 मे रोजी संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 1.23 अब्ज डॉलर्स इतका कमी होत 691.49 अब्ज डॉलर्सवर घसरला आहे. या आधीच्या एक आठवड्यात विदेशी चलन साठ्यामध्ये चांगली वाढ दिसून आली होती. देशाच्या आर्थिक स्थितीला स्थिरता देण्याचे काम विदेशी चलन साठा देत असतो. भारतीय रिझर्व्ह बँक या चलन साठ्याचे व्यवस्थापन पाहत असते. 30 मेच्या आठवड्यात सोन्याच्या साठ्यामध्ये 0.481 अब्ज डॉलरची वाढ झाली असून तो आता 60.66 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.









