नवी दिल्ली :
विदेशी चलन साठ्यामध्ये 2 अब्ज डॉलर्सची घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. 13 डिसेंबरला संपलेल्या आठवड्यामध्ये भारताचा विदेशी चलन साठा 2 अब्ज डॉलर्सने घटून 652.87 अब्ज डॉलर्सवरती घसरला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. सहा महिन्यातील हा नीचांकी विदेशी चलन साठा मानला जात आहे. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 3.235 अब्ज डॉलर्सने घटून 654.857 अब्ज डॉलरवर राहिला होता. काही आठवड्यांमध्ये चलन साठ्यामध्ये घसरण पाहायला मिळते आहे.









