मुंबई:
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये सलग पाचव्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली आहे. या योगे दोन महिन्यांच्या नीचांकावरती विदेशी चलन साठा घसरला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी ही माहिती दिली आहे. 1 नोव्हेंबरच्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 2.7 अब्ज डॉलर्सने कमी होत 682.13 अब्ज डॉलर्सवर राहिला आहे. गेल्या चार आठवड्यामध्ये पाहता देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 20.1 अब्ज डॉलरची मोठी घसरण झालेली आहे. रुपयाही डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला होता. रुपया 84.09 इतक्या नीचांकावर घसरला होता.









