वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या विदेशी चलन साठ्यामध्ये सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये घसरण दिसून आली आहे. देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 28 जुलैला संपलेल्या आठवड्यामध्ये 3.16 अब्ज डॉलर्सची घसरण दिसून आली आहे. विदेशी चलन साठा या प्रकारे 603.87 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती नुकतीच दिली आहे.
या अगोदरच्या आठवड्यातही देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये 1.98 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली होती. देशाचा विदेशी चलन साठा ऑक्टोबर 2021 मध्ये 645 अब्ज डॉलर्सची विक्रमी पातळी गाठू शकला होता. जागतिक स्तरावरील दबावाच्या कारणास्तव गेल्या दोन आठवड्यांमध्ये विदेशी चलन साठ्यात घटीचा सिलसिला राहिला होता.









