नवी दिल्ली :
भारतातील विदेशी चलन साठा 19 जुलैला संपलेल्या आठवड्यात 4 अब्ज डॉलर्सने वाढलेला दिसून आला. या योगे विदेशी चलन साठ्याने 670.857 अब्ज डॉलर्सचा नवा विक्रमी स्तर प्राप्त केला.
सलग तिसऱ्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठ्यामध्ये तेजी दिसून आली. या मागच्या आठवड्यात विदेशी चलन साठा सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. तो विक्रमही 19 जुलैच्या आठवड्यामध्ये आता मागे पडला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
सुवर्ण साठ्यात वाढ
12 जुलैच्या आठवड्यात विदेशी चलन साठा 666.854 अब्ज डॉलर्स या सर्वकालिक उच्चांकावर पोहोचला. विदेशी चलन मालमत्तासुद्धा 19 जुलैच्या आठवड्यात 588.048 अब्ज डॉलरवर पोहोचला. दुसरीकडे देशाचा सुवर्ण साठा 1.329 अब्ज डॉलर्सने वाढला आहे.









