विदेशी चलन साठा 622 अब्ज डॉलर्सवर
मुंबई
भारताचा विदेशी चलन साठा विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. भारताचा विदेशी चलन साठा या आठवड्यामध्ये 622.469 अब्ज डॉलर झाला आहे. विदेशी चलन मालमत्त्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये 2 फेब्रुवारी अखेर 5.186 अब्ज डॉलरची भर पडली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. विदेशी चलन मालमत्ता यायोगे 551.331 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यासोबतच भारताच्या सुवर्ण साठ्यामध्ये देखील 68 कोटी डॉलरची वाढ झाली आहे. भारताचा सुवर्ण साठा आता 48 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे.









