नवी दिल्ली :
देशाच्या विदेशी चलन साठ्यामध्ये मागच्या आठवड्यात विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. भारताचा विदेशी चलन साठा 2.98 अब्ज डॉलर्सने वाढून 648.56 अब्ज डॉलर्स या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या संदर्भातली माहिती दिली आहे. पाच एप्रिलला संपलेल्या आठवड्यामध्ये देशाचा विदेशी चलन साठा 2.98 अब्ज डॉलर्सने वाढून 648.56 अब्ज डॉलर्सवर पोहोचलाय. या आधीच्या आठवड्यामध्ये विदेशी चलन साठा 2.95 अब्ज डॉलर्सने वाढून 645.58 अब्ज डॉलर्सवर पोहोचला होता. यापूर्वीच्या काळात पाहता सप्टेंबर 2021 मध्ये विदेशी चलन साठा 642 अब्ज डॉलर्स ही सर्वोच्च पातळी गाठू शकला होता. याचदरम्यान सुवर्ण साठ्यामध्ये 2.39 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.









